महिलांसाठी खास आत्मसन्मान उपक्रम

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने ‘आत्मसन्मान’ या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत महिलांना त्यांच्या संकल्पना, कठोर मेहनत आणि जिद्द केवळ याच भांडवलावर व्यापार उदीम करण्याची आणि त्याद्वारे उद्योजक होण्याची अनोखी संधी देणारा हा उपक्रम आहे. प्रख्यात अभिनेता स्वप्निल जोशी, तृप्ती पाटील आणि मंजुषा पैठणकर यांच्या एकत्रित व्यवस्थापनाखाली हा उपक्रम दाखल होत असून त्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गोवा येथील महिलांना अनोखी अशी संधी प्राप्त होणार आहे. या प्रकल्पामध्ये सामील होण्यासाठी त्या महिलेकडे स्वतःचे उत्पादन असण्याची, उत्पादन करण्यासाठी भागभांडवल असण्याची, उद्योग कसा सुरू करावा याची संकल्पान असण्याची गरज नाही. त्याची सर्व काळजी ‘आत्मसन्मान’ घेणार आहे. हा उपक्रम ‘व्होकल फॉर लोकल’ या केंद्र सरकारच्या संकल्पनेवर आधारित आहे. या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी 8767663634 या क्रमाकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या