हवामान खात्याकडून मुंबईत ‘यलो’ अलर्ट 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आज रविवार, 9 जुलै रोजी काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा ‘यलो’ अलर्टही हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या इशाऱयामुळे पालिकेनेही आपली यंत्रणा तैनात ठेवली असून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत आज काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. यामुळे काही काळ रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र वाहतूक ठप्प पडणे किंवा ‘बेस्ट’ मार्ग बदलण्याची वेळ आली नाही. तर रेल्वे वाहतूकही सुरळीत सुरू होती. मुंबईत झालेल्या पावसामुळे सात ठिकाणी झाडे-फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. तर दोन ठिकाणी घराच्या भिंती तर 2 ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कुणीही जखमी झाले

नाही.