जगात मुंबईकर सर्वाधिक तास राबतात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई 

मायानगरी म्हणून प्रसिद्ध असलेली मुंबई कधीच झोपत नाही. या शहरात रात्री उशिरापर्यंत रस्तोरस्ती माणसांचा वावर दिसतो. लोकल ट्रेनची गर्दी तर सर्वाधिक चर्चेचा विषय. पण हे मुंबईकर जगभरात सर्वाधिक तास काम करतात. ते सर्वात जास्त राबतात असे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. जगभरातल्या ७७ मोठय़ा शहरांचे  स्वीस बँक यूबीएसच्या वतीने सर्वेक्षण केल्यानंतर मुंबईकर सर्वाधिक तास राबत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिनेव्हा, ज्युरीख आणि लग्जमबर्ग ही शहरे तासाच्या हिशेबाने काम करण्यात अग्रस्थानी आहेत तर मुंबई सर्वात खाली ७६व्या क्रमांकावर आहे. मुंबईनंतर काहीरा या शहराचा नंबर लागतो.

या सर्वेक्षणामध्ये यूबीएसने १५ नोकऱ्या आणि व्यवसायांचा आढावा घेतला. त्यानुसार ज्युरीख सर्वाधिक महागडे शहर ठरले. खरेदी क्षमतेत लग्झमबर्ग सर्वात पुढे आहे.

इतके राबूनही पगार कमीच

इतके राबूनही आणि सर्वाधिक तास काम करूनही कमवण्याच्या बाबतीत मुंबईकर मागेच आहेत. त्यांचे पगार कमीच आहेत. न्यूयॉर्कमध्ये काम करणारा कुणीही तरुण कामगार ५४ तास काम करून आयफोन खरेदी करतो. तर त्याच धर्तीवर मुंबईकरांना मात्र आयफोन खरेदी करण्यासाठी  ९१७ तास राबावे लागेल. दरम्यान, मुंबईत सलूनमध्ये जाणे न्यूयॉर्कपेक्षा स्वस्त आहे.

किती तास काम करतात मुंबईकर

मुंबईकर दरवर्षी तब्बल ३३१४.७ तास काम करतात. तर एकूण १९८७ तास राबतात. त्यामुळे मुंबईकर रोम आणि पॅरिससारख्या युरोपीय लोकांहून दुप्पट काम करत असल्याचे समोर आले आहे. रोममध्ये जनता १५८१ तर पॅरिसमध्ये १६६२ तास काम करत असल्याचे समोर आले आहे.

शहर     कामाचे तास

मुंबई        ३,३१४.७

हनोई       २,६९१.४

मेक्सिको    २,६२२.१

नवी दिल्ली  २५११.४

बागोटा      २,३५७.८

दुबई         २,३२३

इस्तंबूल      २,३१८.६

सेऊल        २,३०७.२

मनीला       २,२८८.८

पॅरीस         १,६६२

रोम           १,५८१