नगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे हे मनपा प्रशासकीय मुख्य कार्यालयात सकाळी साडेनऊ वाजताच हजर झाले, यावेळी बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी हजर होते हे पाहताच आयुक्त संतापले आणि सर्व विभागाचे हजेरी रजिस्टर ताब्यात घेत गेटवरच खुर्ची टाकून बसले व सर्व कर्मचाऱ्यांना धारेवर धरत ऑफिसचा टाईम किती आहे हे विचारात होते, शिपाई यांना साडेनऊ तर अधिकारी यांना पावणेदहा वाजेपर्यंत कार्यालयात हजर असणे बंधनकारक असतानाही अधिकारी कर्मचारी साडेदहा वाजेपर्यंत कार्यालयामध्ये येत नाही हे पाहताच आयुक्त यांचा पारा चढला व प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांची हजेरी घेत चांगलेच खडेबोल सुनावले व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी दिल्या तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याकडून साडे दहा वाजल्यानंतर आल्याबाबतचे कारण लेखी घेण्यात आले. यावेळी उशिरा येणारे कर्मचारी, अधिकारी, प्रभाग अधिकारी, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना यावेळी दिल्या
मनपाच्या मुख्य कार्यालयात एकूण 155 कर्मचारी अधिकरी काम करत असून त्यातील कामावर वेळेत हजर असलेले कर्मचारी 16, उशिरा हजर असलेले कर्मचारी 122, या व्यतरिक्त अतिरिक्त आयुक्त, सर्व उपायुक्त, सहा. आयुक्त, सर्व विभाग प्रमुख वेळेत हजर नाहीत. अशांना आयुक्त पंकज जावळे यांनी सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या व उशिरा येणाऱ्या सर्वांना 1000 दंड आकारण्यात येणार आहे अशी माहिती दिली