Municipal Election 2026 LIVE Update – पुण्यात प्रभाग क्र. 26 मधील 6 मतदान केंद्रातील यंत्र बंद पडली

  • पुण्यात प्रभाग क्र. 26 मधील 6 मतदान केंद्रातील यंत्र बंद पडली
  • सोलापुरात EVM मध्ये बिघाड.
  • पुण्यातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये 2 ठिकाणी EVM बंद
  • अकोल्यातील बीआर हायस्कूलमधील मतदान केंद्रावरील EVM मध्ये बिघाड
  • अकोला आणि चंद्रपुरात EVM मध्ये बिघाड
  • छत्रपती संभाजी नगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यानी मतदानाचा हक्क बजावला.
  • संभाजीनगरमध्ये भाजप उमेदवार आणि पोलिसांत वाद
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप उमेदवार राजू वानखेडे आणि पोलिसांत वाद झाला.
    राजू वानखेडे मतदान केंद्राबाहेर मंडप टाकत होते, पोलिसांनी वानखेडे यांना जेव्हा अडवले तेव्हा हा वाद झाला.
  • क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

  • तुमचे पैसे सापडले, गुंड पुंड सापडले तरीही तुमच्यावर कारवाई का नाही?. दुबार मतदार सापडले तर कार्यक्रम होईलच – किशोरी पेडणेकर
  • धुळे शहरातील प्रभाग क्र. 11 मधील आनंदीबाई जावळेकर शाळेतील EVM मशील बंद पडल्यामुळे उमेदवार आणि उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये वाद
  • चिवडा गल्लीतील मशीनमध्ये बिघाडामुळे, मतदारांना अर्धा तास वाट बघावी लागली. त्यामुळे चिवडा गल्लीतील 235 नंबरच्या मतदान केंद्रावर वेळ वाढवून देण्यात आली आहे.
  • वांद्र्याच्या माऊंट मेरी स्कूलमध्ये EVM मशीन बंद पडलेलं. 15 मिनिटानंतर EVM मशीन सुरु झालीय
  • कुर्ला पूर्व येथील कामगार नगरच्या पंत वालावलकर शाळेतील मतदान केंद्रावर गोंधळ, मतदारांची नावे, केंद्र, बुथ बदल्यामुळे गोंधळ झाला आहे. नावं आणि केंद्र शोधण्यासाठी निवडणूक कर्मचारी सहकार्य करत नसल्याचा आरोप मतदारांनी केला आहे.
  • मुंबईच्या दादरमधील बालमोहन विद्यामंदिरमधील मतदान केंद्रावर मोठा घोळ, मतदार यादीतून मतजारांची नावे गायब असल्याची माहिती
  • नाशिकच्या प्रभाग क्रमांक २६ मध्ये EVM मशीनमध्ये बिघाड
  • लालबाग चिवडा गल्लीत उशीरा मतदानाला सुरुवात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सुधीर साळवी यांचा आरोप.
  • वसई विरारमध्ये मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद, नागरिकांचा मनस्ताप
  • कोल्हापुरातील राजर्षी शाहू विद्यामंदिरात ईव्हीएम मशील दोनवेळा बंद
  • छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रं 5 मध्ये यंत्रात बिघाड झाल्यामुळे यंत्र बदलण्यात आले आहे.
  • मतदानाच्या सुरूवातीलाच नाशिकमध्ये 2 ठिकाणी प्रभाग क्र. 24 आणि प्रभाग क्र29 मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मतदानाला सुरूवात झालेली नाही.
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडेंकडून मतदान प्रक्रियेवर आक्षेप, चौथ्यांदा बटन दाबल्यावर लाईट लागला नाही असे त्यांनी म्हटले आहे. तसेच ईव्हीएम मशीन 14 मिनिटे पुढे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांसाठी गुरुवार, 15 जानेवारी रोजी मतदानाला सुरूवात झाली आहे. तर शुक्रवार, 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदानासाठी पालिकेकडून 10 हजार 231 केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये पालिकेने 64 हजार 375 कर्मचारी-अधिकारी इलेक्शन डय़ुटीवर तैनात केले आहेत. तर मतमोजणीसाठी 23 केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत.

पुण्यात मतदानाला सुरूवात झाली आहे.

अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये सकाळी मतदान सुरू असताना नागरिकांकडे प्रशासनामार्फत येणाऱ्या मतदान केंद्राच्या स्लीप न मिळाल्यामुळे एकच गोंधळ उडाला काही जणांना आपले नाव न शोधता आल्यामुळे पुन्हा माघारी परतावे लागले.

तसेच चार रंगाचे चार मतपत्रिका असतानाच स्वतंत्र मशीन लावणे अपेक्षित होते मात्र एकात्म मशीनवर दोन मतपत्रिका लावल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.