
- मुंबईत 3.30 वाजेपर्यंत 41.08 टक्के मतदान
- ठाणे महानगरपालिकेसाठी 3.30 वाजेपर्यंत 44 टक्के मतदान
- अहिल्यानगर दुपारी 3.30 पर्यंत 48.49 टक्के मतदान
- जळगाव महापालिकेसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 34.27 टक्के मतदान
- जालना महानगरपालिका निवडणूकीसाठी आतापर्यंत 45.94 टक्के मतदान
- मालेगाव महापालिका 3:30 वाजेपर्यंत 45.50 टक्के मतदान
- धुळे महानगरपालिका निवडणूकीसाठी 3.30 वाजेपर्यंत 36.49 टक्के मतदान.
- नांदेड महानगरपालिकेसाठी दुपारी 3.30 वाजे पर्यंत 41.65 टक्के मतदान
- पुण्यात प्रभाग क्रमांक 33 धायरी गावात तणावाचे वातावरण, पैसे वाटपातून राडा झाला.
रवींद्रन लुंगीवाले यांचे छातीवर कमळ लावून मतदान, निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? संजय राऊत संतापले@rautsanjay61 pic.twitter.com/6R0XXK0PrG
— Saamana Online (@SaamanaOnline) January 15, 2026
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी आज वांद्रे पूर्व येथील मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान केले.#BMCElections #BMCElection2026 pic.twitter.com/JnJBYKs6bh
— Saamana Online (@SaamanaOnline) January 15, 2026
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान केले.#BMCElection2026 #BMCElections pic.twitter.com/u6cyPSy0WR
— Saamana Online (@SaamanaOnline) January 15, 2026
-
-
- मुंबईत सकाळी 11.30 वाजेपर्यंत 17.58 टक्के मतदान
- पुण्यात सकाळी 11.30 वाजेपर्यंत 12.50 टक्के मतदान
- नवी मुंबईत सकाळी 11.30 वाजेपर्यंत 15 टक्के मतदान
- कोल्हापूरात सकाळी 11.30 वाजेपर्यंत 17.83 टक्के मतदान
- इचलकरंजी मनपासाठी 11.30 वाजेपर्यंत 18.57 टक्के मतदान
- जळगावात सकाळी 11.30 वाजेपर्यंत 13.39 टक्के मतदान
- उल्हासनगरमध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत 9.92 टक्के मतदान
- बोगस मतदानाच्या संशयावरुन 8 महिलांना घेतलं ताब्यात
- जालन्यात प्रभाग क्र.9 मध्ये बोगस मतदानाच्या संशयावरुन 1 ताब्यात
- चंद्रपूरमध्ये मतदाना दरम्यान राडा,
कुलाबा फायर ब्रिगेड येथील मतदान केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला तसेच मेन रोडवरील दुकाने पोलिसांकडून बंद करण्यात आली आहे. #BMCElection2026 #BMCElections pic.twitter.com/h5z1svzG67
— Saamana Online (@SaamanaOnline) January 15, 2026
- मुंबईमध्ये 227 वॉर्डांसाठी सुरु असलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये, सकाळी 11.30 वाजेपर्यंत 25.87 टक्के मतदान
- निवडणूक याद्यांचा गोंधळ आहेच, नावं वगळली जात आहेत, शाई काही ठिकाणी पुसली जात आहे उद्धव ठाकरे यांची आयोगाच्या गलथान कारभारावर टिका
-
ज्या शाळेत मतदान केले, त्या शाळेबाहेरील वस्तूस्थिती; अभिनेता शशांक केतकरचा संताप pic.twitter.com/McwmR8c1zc
— Saamana Online (@SaamanaOnline) January 15, 2026
-
-
- टिटवाळातील प्रभाग क्रमांक तीनमध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान EVM (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) वर उमेदवाराच्या नावासंदर्भात मोठा गोंधळ. निवडणूक अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार उघड. राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार गटाचे उमेदवार शेखर अप्पाराव वाकोडे यांचे नाव EVM वर चुकीने शेख अप्पाराव वाकोडे नमूद. गंभीर चुकीमुळे मतदारांची दिशाभूल.
- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत 11:30 वाजेपर्यंत 16.03 टक्के मतदान
जोगेश्वरीमध्ये ओशिवरा, रायगड मिलिटरी स्कूल येथील मतदान केंद्रात बोगस मतदान झाल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या अमित सोनावणे या मतदाराने निवडणूक कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केला आहे.#BMCElections #BMCElection2026 pic.twitter.com/JIrdiW4ZzN
— Saamana Online (@SaamanaOnline) January 15, 2026
-
मतदानासाठी कुलाबा फायर ब्रिगेड येथील मतदान केंद्रावर मतदारांची मोठी रांग pic.twitter.com/CMyA9tEqoh
— Saamana Online (@SaamanaOnline) January 15, 2026
- सध्याच्या घडीला सरकारकडून लोकशाहीचे धिंडवडे काढले जात आहेत. संपूर्ण प्रशासन सत्तेसाठी कामाला लागलंय असे म्हणत राज ठाकरे यांनी सरकारसह प्रशासनावर घणाघाती हल्ला केला.
- जळगाव शहरामध्ये आर. आर. महाविद्यालय मतदान केंद्रात तणावाचे वातावरण. मतदान सुरू असताना दोन गटात वाद झाल्याने परिसरात तणाव
- नवी मुंबईत ११.३० वाजेपर्यंत १५% मतदान, पुण्यात ११.३० वाजेपर्यंत १२.५०% मतदान, कोल्हापूरमध्ये सकाळी ११:३० वाजेपर्यंत १७.८३% मतदान
-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी बजावला मतदानाचा हक्क<
संजय राऊत यांनी बजावला मतदानाचा हक्क… #shortsviral #shortsfeed #shortv… https://t.co/ishzsfsadF via @YouTube
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 15, 2026
/p>
- सोलापूर प्रभाग ४ मध्ये एक तासापासून ईव्हीएम मशीन बंद.
- मनेते अविनाश जाधव यांनी निवडणूक अधिकाऱ्याविरोधात केली तक्रार, शिंदेंच्या शिवसेनेच्या चिन्हाचे बॅनर झळकत असल्याचा आरोप. वागळेतील निवडणूक अधिकारी वृषाली पाटील यांच्या विरोधात ऑनलाइन तक्रार दाखल.
- दादरच्या बालमोहन विद्यामंदिर येथील एका मतदान यंत्रात बिघाड. विशाखा राऊत यांच्यासमोरील बटण दाबलं जात नाही अशी तक्रार काही मतदारांनी केली.
- दादरच्या बालमोहन विद्यामंदिर येथील एका मतदान यंत्रात बिघाड. विशाखा राऊत यांच्यासमोरील बटण दाबलं जात नाही अशी तक्रार काही मतदारांनी केली.
- राज्य निवडणूक आयोगाकडून मोठी चूक… बोटावरील शाई पुसली जात असल्याचे नुकताच मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी मान्य केले. त्यानंतर मार्कर पेन आयोगाकडून देण्यात आला.
- पहिल्या दोन तासांतील मतदानाची टक्केवारी- (मुंबई- 6.98%), (छत्रपती संभाजीनगर- 7%), (पुणे- 5.5%), (कोल्हापूर- 5.5 %) (नागपूर 7%)
- धुळे : शहरातील देवपूर परिसरात असलेल्या एल एम सरदार उर्दू हायस्कूल येथील बुथ क्रमांक चार वरील पाच नंबर खोलीचे ईव्हीएम यंत्र बंद पडल्याने मतदारांचा मतदान केंद्राबाहेर खोळंबा झाला.
- पुण्यामध्ये पहिल्या दोन तासांमध्ये 5.50 टक्के मतदान..
- मुंबईत सकाळी 9.30 वाजेपर्यंत 6.98 टक्के मतदान
- नवी मुंबईतील प्रभाग १८ मधील मतदान केंद्रावर गोंधळ
- उल्हासनगर कॅम्प क्रमांक ५ मध्ये ईव्हीएम मशीन बंद,सकाळपासून मशीन बंद असल्याने मतदान ठप्प
- नागपूर-प्रभाग २८ मधील आराधना नगर येथील जीआरके कॉन्व्हेंट मधील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही.
- अपवादात्मकरित्या पाडूचा वापर करावा, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश
- Nagar update- राष्ट्रीय पाठशाळेतील दोन मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती तातडीने बदलावी लागली. मतदानाच्या पहिल्या दोन तासांत काही केंद्रांवर मतदारांचा मोठा उत्साह दिसला, तर काही ठिकाणी शुकशुकाट होता. दरम्यान, माळीवाडा परिसरातील मतदारांचा मोठा खोळंबा झाला; मतदार यादीत नावे दुसऱ्या केंद्रावर (ब्रूस हायस्कूल) गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
- पुण्यात प्रभाग क्र. 26 मधील 6 मतदान केंद्रातील यंत्र बंद पडली
- सोलापुरात EVM मध्ये बिघाड.
- पुण्यातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये 2 ठिकाणी EVM बंद
- सिडको एन ४ मधील संतवीरा मतदान केंद्रावर गोंधळ
- अकोल्यातील बीआर हायस्कूलमधील मतदान केंद्रावरील EVM मध्ये बिघाड
- अकोला आणि चंद्रपुरात EVM मध्ये बिघाड
- छत्रपती संभाजी नगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यानी मतदानाचा हक्क बजावला.
- संभाजीनगरमध्ये भाजप उमेदवार आणि पोलिसांत वाद
- छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप उमेदवार राजू वानखेडे आणि पोलिसांत वाद झाला.
राजू वानखेडे मतदान केंद्राबाहेर मंडप टाकत होते, पोलिसांनी वानखेडे यांना जेव्हा अडवले तेव्हा हा वाद झाला. - क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी मतदानाचा हक्क बजावला
#WATCH | Maharashtra: Legendary cricketer Sachin Tendulkar arrives at a polling station in Mumbai to cast his vote for the BMC elections. pic.twitter.com/4jwAVeLJJe
— ANI (@ANI) January 15, 2026
- तुमचे पैसे सापडले, गुंड पुंड सापडले तरीही तुमच्यावर कारवाई का नाही?. दुबार मतदार सापडले तर कार्यक्रम होईलच – किशोरी पेडणेकर
- धुळे शहरातील प्रभाग क्र. 11 मधील आनंदीबाई जावळेकर शाळेतील EVM मशील बंद पडल्यामुळे उमेदवार आणि उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये वाद
- चिवडा गल्लीतील मशीनमध्ये बिघाडामुळे, मतदारांना अर्धा तास वाट बघावी लागली. त्यामुळे चिवडा गल्लीतील 235 नंबरच्या मतदान केंद्रावर वेळ वाढवून देण्यात आली आहे.
- वांद्र्याच्या माऊंट मेरी स्कूलमध्ये EVM मशीन बंद पडलेलं. 15 मिनिटानंतर EVM मशीन सुरु झालीय
- कुर्ला पूर्व येथील कामगार नगरच्या पंत वालावलकर शाळेतील मतदान केंद्रावर गोंधळ, मतदारांची नावे, केंद्र, बुथ बदल्यामुळे गोंधळ झाला आहे. नावं आणि केंद्र शोधण्यासाठी निवडणूक कर्मचारी सहकार्य करत नसल्याचा आरोप मतदारांनी केला आहे.
- मुंबईच्या दादरमधील बालमोहन विद्यामंदिरमधील मतदान केंद्रावर मोठा घोळ, मतदार यादीतून मतदारांची नावे गायब असल्याची माहिती
- नाशिकच्या प्रभाग क्रमांक २६ मध्ये EVM मशीनमध्ये बिघाड
- लालबाग चिवडा गल्लीत उशीरा मतदानाला सुरुवात, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सुधीर साळवी यांचा आरोप.
- वसई विरारमध्ये मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद, नागरिकांचा मनस्ताप
- कोल्हापुरातील राजर्षी शाहू विद्यामंदिरात ईव्हीएम मशील दोनवेळा बंद
- छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रं 5 मध्ये यंत्रात बिघाड झाल्यामुळे यंत्र बदलण्यात आले आहे.
- मतदानाच्या सुरूवातीलाच नाशिकमध्ये 2 ठिकाणी प्रभाग क्र. 24 आणि प्रभाग क्र29 मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मतदानाला सुरूवात झालेली नाही.
- पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडेंकडून मतदान प्रक्रियेवर आक्षेप, चौथ्यांदा बटन दाबल्यावर लाईट लागला नाही असे त्यांनी म्हटले आहे. तसेच ईव्हीएम मशीन 14 मिनिटे पुढे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांसाठी गुरुवार, 15 जानेवारी रोजी मतदानाला सुरूवात झाली आहे. तर शुक्रवार, 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदानासाठी पालिकेकडून 10 हजार 231 केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये पालिकेने 64 हजार 375 कर्मचारी-अधिकारी इलेक्शन डय़ुटीवर तैनात केले आहेत. तर मतमोजणीसाठी 23 केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत.
पुण्यात मतदानाला सुरूवात झाली आहे.
पुण्यात मतदानाला सुरूवात
(फोटो- चंद्रकांत पालकर pic.twitter.com/SzSaF2sv2c— Saamana Online (@SaamanaOnline) January 15, 2026
अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये सकाळी मतदान सुरू असताना नागरिकांकडे प्रशासनामार्फत येणाऱ्या मतदान केंद्राच्या स्लीप न मिळाल्यामुळे एकच गोंधळ उडाला काही जणांना आपले नाव न शोधता आल्यामुळे पुन्हा माघारी परतावे लागले.
तसेच चार रंगाचे चार मतपत्रिका असतानाच स्वतंत्र मशीन लावणे अपेक्षित होते मात्र एकात्म मशीनवर दोन मतपत्रिका लावल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.





























































