मुरबाड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले, फळझाडांचे मोठे नुकसान

730
प्रातिनिधिक फोटो

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गुरुवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. धासाई, शिदाची, उंबरोली या परिसराला मुसळधार पावसाने झोडपले असून त्यामुळे या भागातील फळ बागांचे व वीट भट्टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. लहान मुलांनी देखील पावसाचा आनंद लुटला. मात्र फळबागांचे शेतकरी व वीट भट्टी व्यावसायिकांची चिंता मात्र वाढली आहे. अचानक आलेल्या पावसाने फळझाडांवरील फळं पडली असून नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या