महाराष्ट्राल लहान मुलींवरच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना संपतच नाहियते. सांगलीत एका नराधमाने 15 वर्षीय बालिकेवर अत्याचार केला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता. तेव्हा आरोपीने हे कृत्य केले आहे. सांगलीत ही घटना घडली असून आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने 2011 साली एक खून केला होता. या प्रकरणा त्याला अटक होऊन कारावासाची शिक्षा झाली होती. दोन महिन्यांपूर्वी आरोपीला पॅरोल मंजूर झाला होता आणि तुरुंगातून बाहेर आला होता. शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास एक 15 वर्षीय मुलगी दुकानात गेली होती. तेव्हा आरोपीने या मुलीला जबरदस्तीने घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलीने घरी जाऊन आईला सर्व सांगितले. आईने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत कारवाई करून आरोपीला अटक केली आहे.