कलिना मतदारसंघात शिवसेनेचाच आवाज, संजय पोतनीस यांना मुस्लिम आणि बौद्ध बांधवांचा पाठिंबा 

1070

कलिना विधानसभा मतदारक्षेत्रात शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप महायुतीचे उमेदवार  संजय पोतनीस यांना स्थानिकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. बुधवारी संजय पोतनीस यांच्या कुर्ला पश्चिम विभागात पार पडलेल्या पदयात्रेत बौद्ध आणि मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

कलिना विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार संजय पोतनीस यांनी आपल्या कार्यकाळात या मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत, प्रत्येक समाजघटकासाठी त्यांनी विकासकामे केली आहेत. त्यामुळे विभागातील सर्व समाजातील नागरिकांचा त्यांना भरघोस पाठिंबा मिळत आहेत. त्यांच्या पदयात्रेचीही ठिकठिकाणी हार-फुले घालून, पेढे भरवून नागरिकांकडून स्वागत होत आहे. बुधवारी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पोतनीस यांची पदयात्रा शिवसेना शाखा क्रमांक 167 पासून सुरू झाली. कुर्ला पश्चिम  येथील अब्बा गणी चाळ, गरीब मोहल्ला, परब चाळ, सणसवाडी, मेहता बिल्डिंग या परिसरातील मुस्लिम बांधवांनी पोतनीस यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच कुर्ला सीएसटी रोडवरील बौद्ध कॉलनीतील बौद्ध बांधवांनीदेखील पदयात्रेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. पदयात्रेदरम्यान संजय पोतनीस नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत. तसेच कलिना मतदारसंघाच्या विकासासाठी जे नियोजन केले त्याची माहिती देत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या