महिलांच्या सुरक्षेसाठी माय सर्कल ऍप, संकट काळात कुटुंबाला जाणार ऍलर्ट मेसेज

सामना प्रतिनिधी । मुंबई

महिलांच्या सुरक्षेसाठी माय सर्कल ऍप नुकतेचे लाँच करण्यात आले आहे. या अॅपमधून संकट काळात कुटुंबातील सदस्यांना किंवा मित्रांना अलर्ट संदेश पाठवून महिलांना आपल्या ठिकाणाचा ट्रक ठेवता येईल.

भारती एअरटेल कंपनी आणि फिकी लेडीज ऑर्गनायझेशन यांच्या वतीने नुकतेच माय सर्कल ऍप सुरू करण्यात आले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, पंजाबी, बंगाली, उर्दू, आसामी, ओडिया आणि गुजराती अशा 13 भाषांमध्ये ते उपलब्ध आहे. एसओएस अलर्ट फक्त ऍपवर एसओएस प्रॉम्प्ट दाबून लाँच केले जाऊ शकते. जी व्यक्ती हे ऍप वापरेल त्याच्या ठिकाणाचा अंदाज घेऊन ऍप सक्रिय होईल. त्यानंतर कुटुंबातील सदस्य वा मित्र ऍलर्ट एसएमएसचा भाग म्हणून पाठवलेल्या लिंकवर रिअल टाइम ट्रक करू शकतात. हे ऍप पूणपणे एअरटेल एक्स प्रयोगशाळेत तयार केलेले आहे.

माय सर्कल ऍपमुळे महिलांचा प्रवास सुरक्षित होईल. टॅक्सी रिक्षा प्रवासात त्यांचा आत्मविश्वास आणि ताकद वाढवण्यात ऍप निश्चितच मदत करेल, अशी प्रतिक्रिया एफएलओच्या पिंकी रेड्डी यांनी सांगितले.

– ऍप डाऊनलोड केल्यानंतर अडीअडचणीच्यावेळी महिलेने निवडलेल्या पाच जणांना ऍलर्ट मेसेज जाईल.
– महिलांनी महिलांसाठी तयार केलेले सुरक्षा ऍप असून लवकरच ते गुगल प्ले स्टोअरवर विनामूल्य उपलब्ध आहे. लवकरच ते स्टोअर- आयओएसवर उपलब्ध होईल.
– एअरटेल सर्विस वापरत नसलेले ग्राहकही ऍप डाऊनलोड करू शकतात.