सॉरी… मला माफ करा, असे लिहीत अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या

708

अकरावीत शिकत असलेल्या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने सुसाईड नोटमध्ये सॉरी… सॉरी… सॉरी… सॉरी… मला माफ करा. असे लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्रिशा सुमंत पाटील असे या मुलीचे नाव असून तिचे वडिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्रिशामागे दोन भाऊ आहेत. सुमंत पाटील यांना त्रिशा एकुलती एक मुलगी होती. तिच्या आत्महत्येमागे प्रेमप्रकरण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करून तपास सुरू केला आहे.

सुमंत पाटील हे नागपूर येथील दवलामेटी येथे राहायला आहेत. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. ते स्वत: कॉन्ट्रॅक्टर असल्याने घरची परिस्थिती चांगली आहे. त्रिशा अकरावीत शिकत होती. एकुलती एक मुलगी असल्यामुळे ती पाटील कुटुंबीयांची लाडाची होती. 16 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वाजताच्या दरम्यान तिने बेडरूममध्ये सिलींग फॅनला ओढणीच्या सहायाने गळफास लावूनआत्महत्या केली. त्यावेळी घरी फक्त सुमंत पाटील यांची पत्नी होती. त्रिशा खोलीमध्ये अभ्यास करीत असावी, असं त्यांना वाटत होत. रात्री 9.30 वाजता जेव्हा त्यांनी तिला जेवणाकरिता आवाज दिला तेव्हा तिच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही. म्हणून त्यांनी वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये जाऊन बघितले असता त्रिशा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी लगेच तिला खाली उतरविले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. याबाबत सुमंत पाटील यांना माहिती मिळताच ते घरी आले. घटनेची माहिती मिळताच वाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून त्रिशाने ज्याठिकाणी आत्महत्या केली त्या खोलीतून सुसाईड नोट जप्त केली. तसेच पोलिसांनी तिचा मोबाईलही ताब्यात घेतला आहे. या सुसाईड नोटमध्ये तिने फक्त ‘सॉरी…सॉरी…सॉरी… सॉरी… मला माफ करा.’ लिहिले आहे. या नोटमध्ये तिने मित्रांचीही माफी मागितल्याचा उल्लेख आहे. पण तिने कोणाला सॉरी आणि कशासाठी म्हटले? याचा पोलिस तपास करीत आहे. या प्रकरणी फिर्यादी सुमंत गुणवंत पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून वाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या