कलिंगडाच्या बियांपासून भक्कम पेस्ट, नागपूर व्हीएनआयटीच्या संशोधकांची कमाल

जुन्या इमारतीमध्ये राहता… पाऊस व हवामानाच्या माऱयामुळे इमारतीला पडलेल्या भेगा आणि छिद्रामुळे त्रस्त आहात… तर कलिंगड वापरा. होय, नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (व्हीएनआयटी) सिव्हील इंजिनियरिंग विभागाने एक आगळेवेगळे संशोधन केले आहे. कलिंगडाच्या बियांमधील ‘युरिएस’ नावाचे एंजाईम बांधकामाच्या मजबुतीकरणासाठी कमालीचा हातभार लावते असे या संशोधनातून समोर आले आहे. विशेष म्हणजे सिव्हील इंजिनियरिंग विभागाच्या डॉ. मधुवंती लाटकर आणि त्यांच्या टीमला या संशोधनाचे पेटंटही मिळाले आहे. कलिंगडाच्या बियांची पेस्ट काँक्रीटच्या बांधकामाला 18 टक्के अधिक मजबुती देते, असे व्हीएनआयटीच्या संशोधकांचा दावा आहे.

  • कलिंगडाच्या बिया वापरून तयार केली जाणारी पेस्ट भेगा आणि छिद्र कायमस्वरूपी बुजवते हे प्रयोगशाळेतील सर्व चाचण्यांमध्ये 100 टक्के सिद्ध झाले आहे. आता लवकरच संशोधक या पेस्टचा वापर प्रत्यक्ष बांधकामात करून ‘फिल्ड व्हॅलिडेशन स्टडी’ करणार आहेत. भरभक्कम बांधकामाच्या ठिकाणी ही कलिंगडाच्या लहान दिसणाऱया बियांची पेस्ट कमाल करून दाखवेल, असा विश्वास संशोधकांना आहे.

‘‘कलिंगड खाल्ल्यानंतर त्याच्या लहान बिया आपण कचऱयात फेकून देतो. मात्र या लहानशा बियांमध्ये युरिएस नावाचे उपयुक्त एंझाईम असते हे आपल्याला माहीत नसते आणि हेच युरिएस एंझाईम कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि युरियासोबत मिळून कॅल्शियम कार्बेनेटसारखे गुणधर्म असलेली पेस्ट तयार करते. कॅल्शियम कार्बेनेट हा पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे ही पेस्ट बांधकामामधील भेग किंवा छिद्रांमध्ये जाऊन त्यास कायमस्करूपी बुजकतच नाही तर भेग किंवा छिद्र पुढे काढूही देत नाही आणि बांधकाम आणखी मजबूत बनवतो.’’ डॉ. मधुवंती लाटकर, व्हीएनआयटी कॉलेज, नागपूर

अनेक वेळेला तर आपण या लहान भेंगांमुळे बांधकाम कमकुवत होऊन इमारती कोसळण्याच्या घटनाही घडतात. कंत्राटदारांना बांधकामातील या समस्या सांगितल्यावर त्यांच्याकडून महागडय़ा आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून हानिकारक अशा ‘केमिकलयुक्त प्री मिक्सर’चा सल्ला दिला जातो. मात्र आता या समस्येवर अगदी स्कस्त आणि पर्यावरणपूरक उपाय सापडला आहे. नागपूरच्या सुप्रसिद्ध विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सिव्हील इंजिनियरिंग विभागाने कलिंगडाच्या बियांपासून एक खास मिक्सर/पेस्ट तयार केली आहे. हे संशोधन करणाऱया डॉ. मधुवंती लाटकर यांचा दावा आहे की, कलिंगडाच्या बियांची पावडर, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि युरियाचे एका विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून पेस्ट बनकली. ही पेस्ट बांधकामातील, इमारतीतील भेगांमध्ये किंवा छिद्रांमध्ये इंजेक्ट केली, तर 28 दिवसांनंतर ती भेग किंवा छिद्र कायमस्करूपी बुजतात, ते पुढे रुंदावत नाहीत आणि बांधकामाला भविष्यात होणारे नुकसान थांबते.

आपली प्रतिक्रिया द्या