
सामना प्रितिनिधी। नगर
येथील न्यायालयाने आरोपी यशवंत सुरेश संत (रा. आरोह नगर, घर नं.8, भिस्तबाग, पाईपलाईन रोड, नगर) यास न वटणारा धनादेश दिल्याबद्दल निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अँक्टचे कलम 138 अन्वये दोषी धरत दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात संत यांनी फिर्यादी मंगलदिप मल्टीस्टेट अर्बन को. ऑप. क्रे.सोसायटी, अहमदनगर यांचेकडून रक्कम रुपये 70,000/- चे कर्ज घेतले होते. कर्जाच्या रकमेच्या परतफेडीपोटी संत यांनी मंगलदिप मल्टीस्टेट अर्बन को.ऑप.क्रे. सोसायटीला धनादेश दिला होता. परंतु हा धनादेश न वटल्यामुळे मंगलदिप मल्टीस्टेटने संत याचे विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अँक्टचे कलम 138 अन्वये अहमदनगर येथील न्यायालयात खटला दाखल केला होता.
या खटल्यात संस्थेच्यावतीने भाऊसाहेब वाघुले यांनी साक्ष दिली. या प्रकरणामध्ये नगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अमीत अ. खंडाळे यांचे कोर्टाने यशवंत सुरेश संत यास दोषी धरुन रक्कम रू.33,000/- दंड व सदर रक्कम न दिल्यास पुढील दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. निकाल 3 रोजी देण्यात आला. मंगलदिप मल्टीस्टेटच्या वतीने अँड. सुहास टोणे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
































































