Nagar: भाजपच्या पदाधिकाऱ्याचा बनाव उघड; चौकशीच्या ऐवजी आजारपणाचे कारण सांगून रुग्णालयातून सूत्र चालवली, काँग्रेसचं आंदोलन

पुण्यामध्ये जसे ललित पाटील प्रकरण गाजले त्याच पार्श्वभूमीवर नगरमध्ये भाजपाचा असलेल्या पदाधिकारी हा जिल्हा रुग्णालयांमधून वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र चालवत असल्याची बाब उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. महाविकास आघाडीचे किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालयामध्ये आता आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे.

पारनेर या प्रकरणांमध्ये विजय आवटी याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता, भाजपाचा तो पदाधिकारी आहे. त्याने आजारपणाचा दाखला घेत नगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये तो थांबलेला होता. गेल्या काही दिवसापासून तो येथील रुग्णालयामध्ये उपचार घेत होता पण त्याचबरोबर नेतो अनेक लोकांशी याठिकाणी संपर्कात होता विशेष म्हणजे तो मोबाईल सुद्धा या ठिकाणी वापरत होता.

ही बाब उघड झाल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले जिल्हा रुग्णालयाने आम्ही त्याला डिस्चार्ज केले आहे, असे सांगितले मात्र तो त्या ठिकाणी गेला नाही ही वस्तुस्थिती आहे. हा सर्व बनाव आता उघड झाल्यानंतर प्रशासन आता सर्व सारवासारव करायला निघाले आहे. याची बातमी कळल्यानंतर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, मनोज गुंदेचा, संजय झिजे आदींच्या उपस्थितीमध्ये जिल्हा रुग्णालयात मध्ये ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले व यावेळी प्रशासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी बोलताना किरण काळे यांनी राज्यामध्ये कायदा संस्थेचा बोजवारा उडालेला आहे राज्याचे गृहमंत्री हे भाजपाचे आहेत व त्यांच्या पदाधिकारी हा अशा पद्धतीने तिथे वावरत आहे ललित पाटील यांची जशी परिस्थिती झाली तशीच ही परिस्थिती नगरमध्ये आता पाहायला मिळत आहेत एकंदरीतच हे प्रकार लक्षात आल्यानंतर प्रशासनाने आता या विषयावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केलेला आहे या प्रकरणाची तात्काळ चौकशी केली पाहिजे व संबंधितांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी करत जिल्हा रुग्णालयामध्ये आंदोलन सुरू करण्यात आले आहे.