Nagar Crime News : जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार, पीडित गर्भवती

महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आजही छेडछाड आणि बलात्काराच्या घटना मोठ्याप्रमाणात घडत आहेत. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशातच नगर जिल्ह्यासहीत महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. जीवे मारण्याची धमकी देत शाळकरी मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार केला आहे.

सदर घटना नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 वर्षीय पीडित कोमल (बदलेले नाव) नेहमीप्रमाणे शाळेत जात होती. मात्र एक दिवस शाळा सुटल्यानंतर आरोपी बबन उगले व बाळासाहेब काशिनाथ लेंडे यांनी कोमलची वाट अडवली आणि तिला जिवे मारण्याची धमकी देत त्यांच्यासोबत घेऊन गेले. नराधमांनी पीडितेला घेऊन जात तिच्यावर आळीपाळीने जबरदस्ती बलात्कार केला. तसेच याबद्दल कोणाला सांगितल्यात जिवे मारण्याची धमकी दिली. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी 28 मार्च 2024 रोजी पुन्हा एकदा पीडितेची वाट अडवली व तिला धमकावून घरी नेत अत्याचार केला. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने 5 जून 2024 रोजी खर्डा पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित मुलीने तिच्या जबाबात दिलेल्या माहितीनुसार, घरामध्ये एकटी असताना आरोपी बाळासाहेब काशिनाथ लेंडे हा पाणी पिण्याच्या बहाण्याने घरी आला पीडितेवर अत्याचार केला. तसेत 26 जानेवारी रोजी पुन्हा एकदा बाळासाहेब लेंडे याने शेतामध्ये बळजबरी शारीरिक संबंध ठेवले. पीडितेने दिलेल्या जबाबानंतर आरोपी राजेश बबन उगले व बाळासाहेब काशिनाथ लेंडे (दोघेही रा. नायगाव ता. जामखेड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर बालकांचे लैगिंक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 (POCSO) चे कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संभाजी शेंडे, शशी म्हस्के, बाळु खाडे, अशोक बडे यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंझाड हे करत आहेत.