जालना तालुक्यातील सेवली येथील माजी सरपंच शेषराव खरात यांच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व सेवली पोलिसांनी अटक केली आहे.
सेवली येथील माजी सरपंच शेषराव विश्वनाथ खरात यांचा मृतदेह आढळला होता. 21 ऑगस्ट रोजी सेवली पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांनी संशयित आरोपी शेख अब्दुल राजिक शेख जफर (रा. सेवली) यास ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखा व सेवली पोलीस ठाणे यांनी त्याची चौकशी केली असता साथीदारांच्या मदतीने खून केला असल्याची कबुली दिली.
त्याआधारे परभणी येथून सय्यद दिलशाद सय्यद जैनोलावोदीन (रा. परभणी) यास ताब्यात घेऊन वरील दोन आरोपींना गुन्हयात अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. तसेच संशयित आरोपी संतोष छवुराव क्षीरसागर (रा. खांबेवाडी,ता.जि. जालना) यास स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी यांनी रेल्वेस्टेशन, जालना येथून ताब्यात घेऊन पुढील चौकशीकरिता पोलीस ठाणे सेवली यांच्या ताब्यात दिले आहे.
पोलीस ठाणे सेवली व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, परतूर उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे, जालना उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सेवली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश खटकळ, रुस्तुम जैवाळ, दीपक घुगे, अक्रूर घाडगे, सागर बावस्कर सर्व स्थागुशा जालना, शरद पवार, राहुल पाईकराव, अमृत वाघ, श्याम राठोड, प्रल्हाद चिरफरे, संतोष चव्हाण, अजय घोडके, संजय उघडे, धनंजय लोढे, मारोती आढे, रामेश्वर दुभळकर, श्याम राठोड, सुनील जाधव, इंदल राठोड, सर्व पोलीस ठाणे सेवली यांनी केली आहे.