माजी सैनिकांचा मेळावा संपन्न

247

लष्करातील माजी सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी आर्म्ड कोअर सेंटर अँड स्कूलमध्ये रविवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी नगरसह बीड आणि लातूर जिल्ह्यातील माजी सैनिकांना आमंत्रित करण्यात आले होते. मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून तब्बल तीन हजार माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय मेळाव्यात सहभागी झाले होते.

मेळाव्याला येणाऱ्या माजी सैनिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. याशिवाय पेन्शनधारकांसाठी बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती, विविध सरकारी कार्यालयासंबंधीच्या तक्रारींचे निवारण, आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी सुविधा, मेळाव्याच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना आर्म्ड कोअर सेंटर अँड स्कूलचे कमांडंट मेजर जनरल शैल्जानन्द झा म्हणाले, ‘माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबायांच्या कल्याणासाठी हा मेळावा आयोजित करण्याचा उद्देश यशस्वी झाला आहे. या मेळाव्याच्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुबायांच्या विविध समस्यांचे निराकरण झाले आहे. राज्य आणि जिल्हा सैनिक बोर्ड यांच्यामध्ये समन्वय असल्यामुळे या समस्यांचे निराकरण करता आले’ दरम्यान, या मेळाव्यामध्ये समस्या सुटल्यामुळे अनेक माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय यांनी लष्कराच्या प्रती आभार व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या