जी पॅड प्रवेश पात्रता परीक्षेत सानिया तांबोळी देशात 28 वी

सामना प्रतिनिधी। नगर

एम. फार्मसीच्या सन 2019 च्या बॅचसाठी घेण्यात आलेल्या देशपातळीवरील जी पॅड प्रवेश पात्रता परीक्षेत नगर तालुक्यातील सारोळा कासार गावातील सानिया शहाजान तांबोळी देशात 28 व्या क्रमांकाने तर महाराष्ट्रात 5 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.

या परीक्षेसाठी देशभरातून 30 हजार विद्यार्थी बसले होते. या यशामुळे तिला एम. फार्मसी साठी देशातील नामांकित असलेल्या हाजीपुर, पंजाब येथील महाविद्यालयात प्रवेश मिळणार असून दरमहा 15 हजार रुपये शिष्यवृत्तीही मिळणार आहे. सारोळा कासार येथील क.भा.पा. विद्यालयात 12 वीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या सानिया हिने 10 वी व 12 वी च्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला होता. राष्ट्रीय शिष्यवृत्तीही तिने मिळविलेली आहे.

या यशाबद्दल तिचे गावचे सरपंच आरती कडूस, पंचायत समिती सदस्य रवींद्र कडूस, शिक्षक नेते संजय धामणे, नामदेव काळे, गजानन पुंड, रमीज तांबोळी, यांच्यासह शाळेच्या शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.