Nagar मोक्याच्या ठिकाणी असलेल्या 10 गुंठे जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न; जेसीबीने तोडफोड

नगर शहरामध्ये मोकळ्या जमिनीवर ताबामारी ही काही थांबायला तयार नाही. नगर शहरांमध्ये नगर मनमाड महामार्गावर 10 गुंठे जागेवर कामाची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मोकळ्या जागेवर ताबा घेण्याच्या आतापर्यंत 34 घटना नगर शहरामध्ये झालेल्या आहेत. या संदर्भामध्ये जिल्हा प्रशासनाकडे सुद्धा अनेकांनी केलेल्या आहेत पण याची दखल घेतली जात नाही, अशा चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

सावेडीतील मनमाड रस्त्यावर डी मार्ट शेजारी असलेल्या 10 गुंठे जागेवरील कंपाउंड, पत्र्याच्या शेडचे जेसीबीच्या सहाय्याने नुकसान करून ताबा मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी (19 ऑगस्ट) दुपारी घडला. याप्रकरणी मयुर राजेंद्र कटारीया (रा. रामचंद्र खुंट, नगर) यांनी काल, मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी सात ते आठ व्यक्तींविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीचे आजोबा नतमल प्रेमराज कटारिया व त्यांचे मित्र सोमनाथ शामराव देवळालीकर यांनी दोघांनी मिळून 1994 साली मनमाड रस्त्यावर सर्व्हे नंबर 241/अ/4 येथे 10 गुंठे जमीन खरेदी केलेली होती. दरम्यान, 2004 मध्ये फिर्यादीचे वडील मयत झाल्याने सदर जमिनीला फिर्यादीचे वडील राजेंद्र कटारीया, चुलते रशीक कटारीया, संजय कटारीया, आत्या मंगल चोपडा व नूतन काठेड हे सर्वजण वारस लागले. त्या जमिनीशेजारी मन्नु शेरा कुकरेजा, भरत कुकरेजा, राजेश कुकरेजा यांची देखील जमीन आहे. त्यांच्याकडून फिर्यादीच्या जमिनीवर वारंवार अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने त्यांनी 2023 मध्ये मोजणी करून पत्र्याचे कंपाऊंड केले. सदर ठिकाणी सीसीटीव्ही बसून व्यवसायाकरिता दोन पत्र्याचे शेड उभे केले व सुरक्षेकरिता दोघांना ठेवले आहे.

अनोळखी सात ते आठ व्यक्तींनी फिर्यादीच्या जमिनीवर येत कंपाउंड, पत्र्याचे शेड, सीसीटीव्ही व इतर साहित्याचे जेसीबीच्या सहाय्याने नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.