नगर शहरासह दक्षिणेतील तालुक्यात आयोजित ‘लाडकी बहीण’ योजनेच्या महिला मेळाव्यात मिंधेंचे नाव गायब करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला श्रीगोंदा, संगमनेर आणि पारनेर तालुक्यात भाजपने दणका दिला आहे. दरम्यान, या घडामोडीमुळे महायुतीमध्ये चांगलीच नाराजी पसरली असून अनेकांनी अशा या चुकीच्या निवडीबद्दल भाजपावर तीव्र शब्दात बोलण्यास सुरुवात सुद्धा केली आहे.
महायुतीमध्ये जागा वाटपावरूनच मोठा पेच निर्माण झाला असताना आता त्यातच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर महायुतीमध्ये अजूनही बेबनाव पाहायला मिळत आहे, त्यातच काल पालकमंत्री यांच्या निकटवर्ती असलेल्या लोकांची नियुक्त करण्यात आल्यामुळे आता अंतर्गत कलह वाढणार हे सुद्धा निश्चित बोलले जात आहे.
याठिकाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी गठीत तालुकास्तरीय समितीवर भाजप पदाधिकारी अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपचे परांपरिक वर्चस्व असणाऱ्या तालुके, विधानसभा मतदाररसंघात भाजपच्या आमदारांना या समितीचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे. यामुळे सध्या गाजावाजा होत असलेल्या लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये मोठा श्रेयवाद असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे आमदार असणाऱ्या तालक्यात महाविकास आघडी गटाच्या आमदारांना योजनेच्या तालुकास्तरीय समितीतून हद्दपार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने ही योजना आहे त्या मिंधे गटाच्या एकाही पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यात तालुका समितीत स्थान मिळालेले नाही. यामुळे लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेय वाद रंगत असल्याचे दिसत आहे.