नेवासे शहरात काही दिवसांपूर्वी भीषण आग लागून पंधरा दुकाने जळून खाक झाली होती. यामध्ये व्यापाऱ्यांचे 1 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. यानंतर अनेक पक्षांच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांची भेट घेऊन मदत करण्याचे आश्वासन देत फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, माजी नगरसेवक संजय सुखधन व शहरातील काही दानशूर व्यक्ती वगळता कोणीही या व्यापाऱ्यांना मदत केली नाही.
नेवासे शहारात भीषण आग लागल्याने छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे सुमारे 1 कोटी 15 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये केश कर्तनालय, फुल भांडार, बेकरी, प्रसाधने दुकान, चप्पल दुकाने आगीत भस्मासात झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक गणीत फिसकटले असून त्यांना तात्काळा दुकाने पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. व्यापाऱ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांच्या मदतीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार शंकरराव गडाख धावून आले आणि त्यांनी व्यापाऱ्यांनी दीड लाखांची मदत जाहीर केली. त्याचबरोबर माजी नगरसेवक संजय सुखधान यांनी सुद्धा आर्थिक मदत जाहीर केली. तसेच शहरातील दानशुर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांच्या आवाहनाला शहरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
नेवासे नगरपंचायतीने अग्नीशामक सेवा केंद्र व अग्नीशमन बंब यासाठी 1 कोटी 90 लाख रुपयांचा प्रस्ताव 2 ते 3 वर्षापासून शासन दरबारी दाखल केला आहे. परंतु विकास कामे व सरकारच्या योजेनेसाठी नेवासा तालुक्याला राजकीय सूडबुद्धीतून निधी मिळत नाही. जर नगर पंचायतीचा प्रस्ताव मंजूर झाला असता, तर ही घटना टळली असती. अशी चर्चा नागरिक करीत आहेत.