Nagar News – नगर दौंड महामार्गावर ट्रक व अर्टिगा गाडीचा अपघात, एक ठार दोन जखमी

नगर दौंड महामार्गावर ट्रक व अर्टिगा गाडीचा भीषण अपघात होऊन यामध्ये एक जण मृत्युमुखी पडला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले व ग्रामस्थांनी तात्काळ मदत कार्य केले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू झाली आहे. या महामार्गावर सलग चौथा अपघात झाला आहे

संभाजीनगरकडून दौंडकडे आज सकाळी अर्टिगा गाडी जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकचा काळेवाडी या ठिकाणी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे. विशेष म्हणजे अन्य काहीजण यामध्ये अडकून पडलेले होते. या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर ते सुद्धा या ठिकाणी धावत गेले. उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले,नारायण रोडे, तुषार पवार, शैलेश काळे ,भागवत काळे, नितीन काळे, राहुल काळे ,शुभम काळे यांनी तात्काळ या ठिकाणी मदत कार्य सुरू केले व गाडीमध्ये अडकल्यांना बाहेर काढले. त्यांच्या हाता पायाला तसेच डोक्याला इजा झालेली आहे. त्यांच्यावर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जखमी संभाजीनगर जिल्ह्यातील असावे असा अंदाज आहे. अद्याप पर्यंतया अपघातात जो मयत झाला त्याची ओळख पटलेली नाही.

नगर दौंड महामार्गावर सलग चौथा अपघात झालेला आहे. या अगोदर सुद्धा अशा प्रकारच्या घटना या घडलेल्या असल्यामुळे या महामार्गावर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी सुद्धा अनेक वेळेला करण्यात आलेले आहे ,मात्र याकडे वृक्ष करण्यात आलेले आहे. सलग घडलेल्या या अपघाण्याच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.