Nagar News – पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलीस कोठडी

नेवासा येथील हत्या प्रकरणी मयताच्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मीना म्हस्के आणि लहू डुमरे अशी आरोपींची नावे आहेत. अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीनेच पतीचा काटा काढला होता.

दोन आठवड्यांपूर्वी पाचेगाव येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीत संशयित कार आढळून आल्यानंतर पोलिसांनी कारचा शोध लावला.

तपासादरम्यान कार मालकाचा शोध घेतल्यानंतर पुढील सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी मयताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.