नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत भाऊगर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी 242, तर गुरुवारी 144 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून, एकूण प्राप्त अर्जांची संख्या 852 झाली आहे. सोमवारी छाननीनंतर यातील किती अर्ज शिल्लक राहणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासून मोठय़ा प्रमाणात अर्ज विक्री होत आहेत. पहिल्या दिवशी शुक्रवारी पाच अर्ज दाखल झाले होते. शनिवार, रविवारी सुट्टी असल्यामुळे अर्ज दाखल झाले नाहीत. मात्र, सोमवारी 120, मंगळवारी तब्बल 341, बुधवारी 242, तर गुरुवारी 144 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. यामुळे कालपर्यंत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची संख्या 852 झाली आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी 14 तालुक्यांचे 14 सर्वसाधारण मतदारसंघ, त्याचसोबत महिला राखीव, इतर मागासवर्गीय मतदारसंघ, एनटी, नॉनटिचिंग आणि भिंगार छावणी मंडळ असे मतदारसंघ आहेत. दुसरीकडे निवडणुकीतील मंडळांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. जाहीरनामा तयार करण्यात मंडळांतील तज्ञ शिक्षक व्यस्त आहेत. गुप्त गाठीभेटी आणि बैठकांचा जोर वाढला आहे.

मतदारसंघनिहाय उमेदवारी अर्ज

– संगमनेर 46, नगर 41, पारनेर 42, कोपरगाव 25, राहाता 17, श्रीरामपूर 37, जामखेड 40, पाथर्डी 43, राहुरी 26, शेवगाव 25, श्रीगोंदा 41, अकोले 27, नेवासा 41, कर्जत 31, भिंगार 36, अनुसूचित जाती-जमाती 65, महिला राखीव 103, ओबीसी 90 आणि एनटी 65 अशा 582 अर्जांचा समावेश आहे.