नागपूरात कोरोनाबाधिताची संख्या एक लाखाच्या वर

31 ऑक्टोबर रोजी राज्याच्या उपराजधानीत 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात 2 रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील असून ग्रामीण भागात मृत्युसंख्या 4 आहे. तर 5 मृत्यू शहरामधील आहे. एकूण मृत्यू संख्या 3403 झाली आहे. तर बाधित रुग्णांची संख्या 102786 झाली आहे.

गेल्या 24 तासात 236 बाधित रुग्ण आढळले असून 456 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. बाधित रुग्णांची संख्या 102786 वर पोहोचली आहे. तर कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या 95103 झाली असून रिकव्हरी रेट 92.53 टक्के झाला आहे. अशीच स्थिती राहिली तर नागपूर शहर कोरोना मुक्त व्हायला वेळ लागणार नाही. 4266 चाचण्या झाल्या असून शहरातील 3307 तर ग्रामीणमध्ये 959 चाचण्या झाल्या आहेत. सध्या नागपूर शहरात 4280 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत

आपली प्रतिक्रिया द्या