नागपूरमध्ये कोविड हॉस्पिटलला भीषण आग, चार रुग्णांचा मृत्यू

नागपूरमध्ये शुक्रवारी एका कोविड हॉस्पिटलला भीषण आग लागली. या आगीत 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

नागपूरच्या वेलट्रीड रुग्णालयाला भीषण आग लागली. या रुग्णालयात 27 रुग्णांवर उपचार सुरू होते. सर्व रुग्णांना तातडीने दुसर्‍या रुग्णालयात हलवण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्नीशमन दलाला मोठ्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीमध्ये काही रुग्ण जखमीही झाले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या