
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नागपूर जिल्हय़ातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या प्रभारी नियुक्त्या आज पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या. या नियुक्त्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन प्रभारी तत्त्वावर करण्यात आलेल्या आहेत. पदाधिकाऱयांच्या कार्याचा आढावा घेऊन त्या कायम करण्यात येतील अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.
सहसंपर्कप्रमुख– मंगेश काशीकर (नागपूर पश्चिम, नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर दक्षिण)
महानगरप्रमुख– प्रमोद मानमोडे (नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम) व किशोर कुमेरिया (नागपूर पूर्व, नागपूर दक्षिण, नागपूर उत्तर)
शहरप्रमुख– नितीन तिवारी (नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर), दीपक कापसे (नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर दक्षिण), प्रवीण बरडे (नागपूर पूर्व, नागपूर मध्य)
शहर संघटक– विशाल बरबटे (नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर उत्तर) व किशोर पराते (नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम)



























































