नागपुरात खळबळ, पाच वर्षांच्या मुलीची अत्याचार करून हत्या

639
प्रातिनिधिक

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पाच वर्षीय चिमुकलीचा गावालगतच्या शेतात दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी (8 डिसेंबर) रोजी सकाळी उघडकीस आली. ती पाच दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचीही माहिती प्रथमदर्शनी पुढे येत आहे.

या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशी हादरली आहे. तिचे वडील हे मोलमजुरीसाठी मागील पाच वर्षांपासून लिंगा या गावात वास्तव्याला आहेत. तर मुलगी ही स्थानिक जिल्हा परिषद शाळा बालवाडीत शिकत होती. 6 डिसेंबरला मुलगी गावात राहणार्‍या तिच्या आजीकडे जाते म्हणून घरून निघाली मात्र, परत आली नाही. तिचा सर्वत्र शोधाशोध केला असता कुठेही आढळून आली नाही. याविषयीची तक्रार कळमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. यानंतर तपासाला सुरुवात झाली.

आपली प्रतिक्रिया द्या