रुग्णालयात मृतदेह घेऊन आलेल्या वाहनाने पाच जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू

980

मृतदेह घेऊन आलेल्या एका खासगी वाहनाच्या वाहनचालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून रुग्णालय परिसरातील पाच जणांना गंभीररित्या चिरडले. ही घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात घडली. यात मुमताज शेख नावाची महिला आणि सुधीर हरिश्चंद्र गराने या पुरुषाचा जागीच ठार झाली, तर चार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने रुग्णालय परिसरात सकाळी नागरिकांमध्ये चांगलाच हडकंप माजला होता.

chandrapur1

गोपालपुरी येथील एका महिलेने आत्महत्या केली. तिचा मृतदेह रुग्णालयात आणण्यासाठी नातेवाईकांनी परिसरातीलच एमएच 34/बीएफ 5815 क्रमांकाचे वाहन केले. या वाहनाने मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर परत जात असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित वाहनाने पाच जणांना चिरडले. यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिघे जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

chandrapur2

सकाळच्या सुमारास रुग्णालयाच्या आवारात रुग्णांच्या नातेवाईकांची आणि रुग्णांचीही वर्दळ असते. वाहनचालकाने वाहन नागरिकांमध्ये घुसविल्याने पाच जण गाडीखाली आल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले आहे़ घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांमध्ये चांगलीच तारांबळ उडाली. मुमताज शेख, सुधीर हरिश्चंद्र गराने अशी मृतकांची नावे आहेत. तर जखमींमध्ये मिराबाई सिताराम हुपरे (45), राजेंद्र देविदास कांबळे (37) सिंदेवाही आणि शकिरा पठाण यांचा समावेश आहे. घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी वाहनचालक दिनेश बांबोळे याला अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या