नागपूर कारागृहातील 30 कैदी कोरोना बाधित, जेल झाला हॉट स्पॉट

370

नागपूर मध्यवर्ती कारागृह कोरोनाचा हॉटस्पॉट झाला असून आज पुन्हा 30 कैदी कोरोनाबाधित आढळल्यामुळे तुरूंग प्रशासन हादरून गेले आहे, गेल्या चार दिवसात कारागृहात ९६ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे.शहरात कोरोना बाधितांचा आकडा १६७२ वर पोहचला आहे.

गेल्या तीन दिवसात कारागृकात ६६ रुग्ण आढळले होते त्यात पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता. आज मात्र ३० कैदी बाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे, कारागृहात विलगीकरण केंद्र तयार करव्यात आले असून काही१ रूग्णांना तेथेच ठेवून उपचार सुरू करण्यात आले आहे. आज शहरात अद्याप पावेतो ५८ बाधित रुग्ण आढळले त्यात ३० रुग्ण जेल मधील आहे. जेल एक मे पासून लॉकडाऊन केले आहे. टीम ए व टीम बी अशी वर्गवारी करून २१-२१ दिवसाचा कालावधी निश्चीत करण्यात आला आहे, असे असताना बाधित रुग्ण सापडतो कसा प्रश्न उपस्थित झाला आहे. १६७२ बाधित रुग्णा पैकी १२८७ रुग्ण बरे झाले आहे,तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु आहे.

आपली प्रतिक्रिया द्या