नागपूर कारागृहात कोरोना रुग्णांची शंभरी पार!

278

उपराजधानीत कोरोनाचे थैमान सुरूच असून, या संसर्गजन्य आजारामुळे बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांचीही संख्या झपाट्याने वाढतच आहे. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी उपराजधानीत आणखी एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या ३२ वर पोहोचली आहे, तर प्रथमच शहरात बाधितांच्या एका दिवसातील आकडेवारीने शंभरी गाठली आहे. मध्यवर्ती कारागृहातून तब्बल १३२ बाधितांची नोंद झाली आहे. दिवसभरात विविध प्रयोगशाळांतून १५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्याही २०८६ च्या घरात पोहोचली आहे. यापैकी १४५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

विदर्भात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी असलेल्या नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचा व बळींचा आकडा दररोज वाढतच आहे. यामुळे आरोग्य प्रशासनासह नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे, परंतु ‘अनलॉक’पासून नागरिकांचीही बेफिकिरी वाढली आहे. त्यामुळेच की काय, बाधितांची रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत असल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये कुंभारटोली येथील ३, कामठीच्या सैन्य रुग्णालयातील १, जुनी मंगळवारी १, खदान १, बगडगंज १, हनुमाननगर मनपा कार्यालय परिसर १ व मेयोतील एका निवासी डॉक्टरचा समावेश आहे. मेयोचेच पथक मध्यवर्ती कारागृहामध्ये रॅपिड अॅन्टिजेन तपासणीसाठी गेले होते. यामध्ये १४९ पैकी १०० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. यात बहुतांश वैâद्यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या