पॉर्न फिल्म बघून सेक्स करताना केला प्रयोग, तरुणाचा गुदमरून मृत्यू

पॉर्न फिल्म बघून वेगवेगळ्या प्रकारच्या पोजिशन्स व भलते सलते प्रयोग करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे.  दोरीचा वापर करून सेक्स करण्याच्या नादात एका तरुणाला गळफास लागून त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉजवर घडली आहे.

सदर 27 वर्षीय तरुण त्याच्या 20 वर्षीय गर्लफ्रेंडला घेऊन दहेगाव (रंगारी) परिसरात असलेल्या महाराजा लॉज गेला होता. तेथे ते दोघे एकमेकांच्या जवळ आले. त्या तरुणाला पॉर्न बघण्याची सवय होती. त्यातूनच त्यांनी सेक्स करताना वेगवेगळे प्रयोग करायचे ठरवलेले. यावेळेस त्या दोघांनी दोरीचा उपयोग केला. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले आले. त्याच वेळी ती दोरी त्याच्या गळ्याच्या भवती सुद्धा अवळण्यात आली होती. सेक्सनंतर ती तरुणी बाथरूममध्ये गेली असता तो तरुण खुर्चीसह खाली कोसळला. ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला आणि त्याला गळफास बसला. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ज्यावेळी ती तरुणी बाथरूमच्या बाहेर आली. तो पर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांना देण्यात आली होती. त्यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून,घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे

आपली प्रतिक्रिया द्या