नागपूर पदवीधर मतदार संघ- गडकरी विरुद्ध फडणवीस वाद आणि अतिआत्मविश्वास

नागपूर पदवीधर मतदारसंघावर गेल्या 58 वर्षांपासून भाजपचे वर्चस्व होते, भाजपच्या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी भाजपचे उमेदवार  महापौर संदीप जोशींचा पराभव करून संघभूमीत आज तिरंगा फडकवल. भाजपचे ज्येष्ठ नेते, पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होता. मात्र नागपूर विभागातील मतदारांनी या नेत्यांना धोबीपछाड दिली. भाजपचा अति आत्मविश्वास नडला.

भाजपमध्ये गडकरी व फडणवीस असे दोन गट पडले आहेत. विद्यमान आमदार अनिल सोले यांचे तिकीट कापून देवेंद्र फडणवीस यांनी आपला जवळचा विश्वासू महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी जाहीर केली. त्याच दिवशी भाजपमध्ये खरी फूट पडली. नेते फक्त शरीराने जोशी सोबत होते, मनाने जोशी याचा काटा काढता येतो का प्रयत्नात होते.

ओबीसी व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. ही मागणी फेटाळल्यामुळे ओबीसीवर्ग नाराज होता. ओबीसी भाजप कार्यकर्त्यांनी वचपा काढून एक प्रकारे आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांना एकप्रकारे मदत केली. त्याचा फटका देवेंद्र फडणवीस गटाला बसला. जोशी पराभूत होताच भाजच्या नाराज कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

गेल्या 58 वर्षांपासून म्हणजे पंडित बच्छराज व्यासपासून आजपर्यंत या मतदारसंघावर जनसंघ व भाजपचे वर्चस्व होते. देवेंद्र फडणवीस यांचे वडील स्व. गंगाधरराव फडणवीस यांनी तब्बल 12 वर्षे या संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधनानंतर तब्बल 25 वर्षे नितीन गडकरी यांनी पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर आनिल सोले आमदार झाले. या मत्तेदारीला मतदार व भाजप कार्यकर्ते कंटाळले होते. त्याचा फटका भाजपला बसला. अति आत्मविश्वास नडला.

आपली प्रतिक्रिया द्या