आरोपींना कडक शिक्षा करा, नागपूरातल्या निर्भयाचा आक्रोश

10
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । नागपूर

‘त्या नराधमांनी माझ्यावर खूप अत्याचार केले, मला खूप मारलं, मला प्रचंड वेदना होत आहेत. त्यांना लवकरात लवकर फासावर लटकवा, असा आक्रोश नागपूरमध्ये १४ ऑगस्ट रोजी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीने केला आहे. पीडित तरुणीचाा घटनेनंतर पहिल्यांदाच जबाब नोंदविण्यात आला. या तरुणीने जबाबाच्या वेळी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. पीडित तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा होत असून मानसोपचारतज्ज्ञांकडून तिचे सुमपदेशन देखील केले जात आहे.

पीडित तरुणी ही सरकारी कर्मचारी होती. तिच्या कार्यालयात प्रसाधनगृह नसल्याने महिलांना सार्वजनिक ठिकाणी नैसर्गिक विधींसाठी जावे लागत होते. १४ ऑगस्ट रोजी देखील पीडित तरुणी नेहमी प्रमाणे कामाला गेली होती. दुपारी दोनच्या सुमारास ती सार्वजनिक ठिकाणी नैसर्गिक विधीसाठी गेली त्यावेळी मानकेश चक्रवर्ती आणि संतोष माळी तिचे अपहरण केले. त्यानंतर आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या हैवानांनी आपली ओळख पटू नये यासाठी तिचे डोळे फोडले, तिचा चेहरा दगडाने ठेचला. बराच वेळ झाला पीडित तरुणीन न परतल्याने तिच्या कार्यालयातील इतर महिलांनी तिची शोधाशोध केली तेव्हा ती तरुणी जवळपासच रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. त्यानंतर तिला तत्काळ ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित तरुणीला रुग्णालयात नेल्यानंतर तिची परिस्थिती बघून डॉक्टरांना देखील धक्का बसला होता.

SUMMARY : NAGPUR RAPE VICTIM DEMANDS STRICT ACTION AGAINST ACCUSED

आपली प्रतिक्रिया द्या