नागपुरात कोरोना रुग्णसंख्या 1402, आज दोघांचा मृत्यू

522

अनलॉकनंतर आता नागपूर शहरातील नवनवीन वसाहतीतून बाधित रुग्ण आढळून येत असल्याचे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. काल 51 बाधितांची नोंद झाली. आज त्यात नव्या 18 रुग्णांची भर पडल्याने शहरातील एकूण बाधितांची संख्या 1402 वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी 1044 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान आज एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यू संख्या 23 कर पोहोचली आहे. मृतकांमध्ये एका पुरूषाचा व महिलेचा समावेश आहे.

शहरातील विविध संस्थात्मक विलगीकरण केंद्रात 1883 संशयित आहेत. परंतु यापैकी बहुतांश जणांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रथम नमुने घेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा दुसरा नमुना सात दिकसांनी घेणइs अपेक्षित आहेत. त्यामुळेच शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी नमुनेच कमी आल्याचे सांगण्यात येते. शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये 190 वरच नमुने तपासण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या