नागपूर- ओढय़ात सापडून दोन महिलांचा मृत्यू

विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूरमध्ये शुक्रवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाला थोडा दिलासा मिळाला आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे काम सुरू होते. वर्धा जिल्ह्यातील वायगाव येथे शेताचे काम आटोपून परत जाणाऱया तीन महिला पुलावर अचानक आलेल्या पाण्याच्या ओढय़ात सापडल्या. त्यात दोघींचा मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली आहे.

वर्धा जिल्ह्यातील वायगावजवळ सोनेगाव-मीरापूर नाल्याजवळच्या शेतात काम करणाऱया महिलांवर मोठा प्रसंग आला. शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास आपली शेतातील कामे आटोपून काही महिला घरी परत यायला निघाल्या. त्यावेळी पुलवार फारसे पाणी नव्हते. मात्र पूल ओलांडत असताना अचानक नाल्यातील पाण्याची पातळी वाढली आणि प्रवाहाचा वेगही वाढला असल्यामुळे त्या तिघीही पाण्यात लोटल्या गेल्या. त्यांची आरडाओरडा ऐकून जवळपासच्या लोकांना त्यांना बाहेर काढून रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्यापैकी चंद्रकला लोटे (45), बेबी भोयर (45) यांनी मृत झाल्या होत्या तर वैशाली बावने (35) या गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या