
राज्यात सरकारने कडक निर्बंध जारी करून फक्त सरकारी आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱयांसाठीच लोकल प्रवासाची मुभा दिली आहे. मात्र शुक्रवारी सकाळी नालासोपारा रेल्वे स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी उसळली. लोकलने प्रवास करायला मिळावा म्हणून सर्वसामान्य प्रवासीही रेल्वे स्थानकात धडकले. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर कोणतेही प्रवाशी आत शिरू नये यासाठी रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलिसांनी जिन्याजवळ बॅरिकेड टाकून प्रवेशद्वार बंद केले.





























































