दोन रुग्ण आढळताच नामिबियाने लावला लॉकडाऊन; कोरोनावर मिळवले नियंत्रण

888

देशात दोन कोरोनाग्रस्त सापडताच नामिबिया सरकारने तत्काळ देशाच्या सीमा बंद केल्या आणि देशात तत्काळ लॉकडाऊन लागू केला होता. त्यामुळेच जगाला भेडसावणार्‍या कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यात हे छोटेसे अफ्रिकन राष्ट्र यशस्वी ठरले आहे. जे अमेरिका, इंग्लंड, हिंदुस्तान आणि युरोपातील श्रीमंत देशांना सुचले नाही ते करून दाखवतानाच कोरोनाला रोखणाऱ्या नामिबियाच्या चातुर्याचे आणि प्रसंगावधानाचे जगभरातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे सरकारी उपाययोजना वेळेत झाल्याने नामिबियात कोरोनामुळे एकाही नागरिकाला प्राण गमवावा लागलेला नाही.

नामिबियात 13 मार्चला पहिला कोरोना रुग्ण सापडला. त्यानंतर सरकारने तात्काळ देशात आणीबाणी लागू करत वैद्यकीय उपाययोजना सुरू केल्या. देशात महिनाभर कडक लॉकडाऊन लावला. त्यामुळे सात एप्रिल नंतर या देशात एकही नवा करोना ग्रस्त सापडला नाही. नामिबिया एकूण 23 कोरोनाचे रुग्ण सापडले होते. त्यातील नऊ जणांवर आता उपचार सुरू आहेत. मात्र कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरही दक्षतेचा उपाय म्हणून आजवर नामिबिया आपल्या देशाच्या सीमा विदेशी नागरिकांसाठी उघडलेल्या नाहीयेत. देशाच्या महिला पंतप्रधान सारा कुनगोंगेल्वा यांच्या चातुर्यपूर्ण योजनेचे आता जगभरातून कौतुक होत आहे.

तत्काळ पावले उचलण्याचा फायदा झाला- पंतप्रधान
देशात मार्चमध्ये कोरोनाते दोन रुग्ण मिळतात आम्ही पुढचा धोका ओळखला. राष्ट्राध्यक्ष हेग जीनगोब यांनी दहा तासांच्या आतच इथिओपिया आणि दोहा येथून येणाऱ्या प्रवाशांना देशात प्रवेश बंद केला. देशातही नागरिकांच्या फिरण्यावर बंधने आणली. नागरिकांच्या आरोग्याला आम्ही प्राथमिकता देत उपाय सुरू केले. 24 मार्च नंतर 30 दिवसांचा कडक लॉकडाऊन आम्ही लावला. अर्थात नागरिकांना बळेच घरात थांबवणे सोपे नव्हते. सरकारी माध्यमातून आम्ही गरीब आणि गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. वेळीच पावले उचलल्याने आम्हाला कोरोनावर नियंत्रण मिळवता आले, अशी माहिती नामिबियाच्या पंतप्रधान सारा कुनगोंगेल्वा यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेसह जगातील सर्व देशांनी नामिबिया सारख्या गरीब देशाने कोरोनाला रोखण्यासाठी दिलेल्या लढ्याचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या