नानाजी ढवंगाळे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखिल भारतीय महानुभव महामंडळाचे उपाध्यक्ष नानाजी ढवंगाळे (77) यांचे सोमवारी ह्रदयकिकाराच्या तीव्र झटक्याने नागपूरमध्ये निधन झाले.  नानाजी ढवंगाळे  अत्यंत धर्मनिष्ठ होते. तसेच अनेक सामाजिक उपक्रमातही त्यांचा सहभाग होता. श्री चक्रधर भगवंतांचे ते सच्चे उपासक होते

धर्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतं. धर्मातील गहन तत्त्वांचा त्यांना अपार ज्ञान होते. समाजालाही हे ज्ञान मिळावे यासाठी त्यांनी दोन पुस्तकही लिहली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, अजय आणि विजय ही दोन मुले, तीन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.