
लातूर येथील सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील रिंग रोडवरून नांदेड येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाला मोटरसायकलसह पोलीसांनी ताब्यात घेतले. दुचाकी चोरीसाठी तो नांदेड वरून लातूरला येत होता. त्याने चोरीच्या सात दिवसांनी पोलिसांनी जप्त केले आहेत. दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात यश प्राप्त झाले आहे.
दिनांक 24/07/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीतील मोटार सायकल चोरणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील रिंग रोड वरून नांदेड येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाला मोटरसायकलसह ताब्यात घेतले. इरबा उर्फ संभा पंढरीनाथ शिकारी, वय 28 वर्ष राहणार लादगा, तालुका मुखेड जिल्हा नांदेड हा दुचाकी चोरीसाठी नांदेड जिल्ह्यातून लातूर येथे येत होता. त्याने लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दी मधून मोटार सायकली चोरी केल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीच्या सात मोटारसायकली एकूण किंमत 03 लाख 95 हजार रुपयाच्या जप्त करण्यात आल्या. यामध्ये पोलीस ठाणे शिवाजीनगर एमआयडीसी व गांधी चौक येथील मोटार सायकल चोरीचा प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत . उर्वरित मोटरसायकल संदर्भाने तपास सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार युवराज गिरी प्रदीप स्वामी, राजेश कंचे, सिद्धेश्वर मदने,जमीर शेख, राहुल कांबळे गणेश साठे,काका बोचरे यांनी पार पाडली.