नांदेड – शंकर नागरी घोटाळा प्रकरणातील केनियन युवकाला अटक

14 कोटी 46 लाखांच्या बँक घोटाळा प्रकरणात विशेष तपास पथकाने एका केनियन युवकाला रात्री अटक केली आहे. 14 कोटी 46 लाखांच्या शंकर नागरी सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी धारवाड कर्नाटक येथून पकडून आणला आहे. हा केनिया देशाचा नागरिक असून त्याचे वय 23 वर्ष आहे.

बँक घोटाळा प्रकरणात या युवकाने एका महिलेच्या बँक खात्याला स्वतः वापरले आहे. केनियन युवकाला अटक झाल्यानंतर या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या 5 झाली आहे. ज्यात दोन महिला आणि एक पुरुष 30 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. एक आरोपी विधी संघर्षग्रत बालक आहे.

कोल्हापूर येथून पकडून आणलेल्या महिलेचे खाते केनियन युवक वापरत होता.वेळोवेळी बँक नेहमीच आपल्या ग्राहकांना आपल्या बँक खात्यांची सुरक्षा करण्यासाठी दक्षता सांगत असते. तरीही कोल्हापूरच्या महिलेने केनियन युवकाला आपले खाते वापरण्यासाठी कसे दिले याचा सविस्तर तपास होण्याची गरज आहे. असे फ्रॉड करतांना हनी ट्रप प्रकार आहे काय? याची तपासणी सुध्दा होणे गरजेचे आहे. नांदेड पोलिसांना या प्रकरणाचा मुख्य आरोपी शोधण्यात यश यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या