दर्याराजा शांत हो! रत्नागिरीत नारळी पोर्णिमा उत्साहात

431

‘दर्याराजा शांत हो…आमचं रक्षण करं! यंदाच्या मौसमात चांगली मच्छी मिळून आमची भरभराट कर’, अशी पार्थना करत बुधवारी नारळी पोर्णिमेला समुद्राची पूजा करत श्रीफळ अपर्ण करण्यात आले. रत्नागिरीतील मांडवी किनारी सायंकाळी गर्दी झाली होती. किनारपट्टीवर रहाणाऱ्या नागरिकांनी खवळलेल्या समुद्राला श्रीफळ अर्पण करत शांत हो अशी पार्थना केली.

पिढ्यानपिढ्या समुद्रावर उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छिमार बांधवांसाठी नारळी पोर्णिमा हा मोठा सण असतो. मच्छिमार बांधवांनी समुद्राची भक्तीभावाने पूजा करून आणि श्रीफळ अर्पण केले. रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी मांडवी समुद्रकिनारी श्रीफळ अर्पण केले.

आपली प्रतिक्रिया द्या