रत्नागिरीत नारळीपौर्णिमा उत्साहात साजरी

बा सागरा, शांत हो अशी प्रार्थना करत मच्छिमारांसह नागरिकांनी समुद्राला श्रीफळ अर्पण केले. रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्र किनारी श्रीफळ अर्पण करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा मोठा सण आहे. वर्षभर ज्या समुद्रात मासेमारी करून उदरनिर्वाह करणारा हा मच्छिमार बांधव या दिवशी समुद्राची मोठ्या भक्तीभावाने पुजा करतो. समुद्राला श्रीफळ अर्पण करत खवळलेल्या समुद्रा शांत हो, अशीच कृपादृष्टी आमच्यावर ठेव, अशी प्रार्थना करतो. नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला खऱ्या अर्थाने वेग येतो.