मी नक्की कुठे, निर्णय दहा दिवसांत – नारायण राणे

4325

मी भाजपात असेन की स्वतःचा पक्ष चालवणार याबाबतचा निर्णय येणाऱया दहा दिवसांत घेण्यात येईल. काँग्रेस सोडताना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भाजप नेत्यांनी मला काही कमिटमेंट दिल्या आहेत. त्या अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे.

काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केल्यावर भाजपकडून राज्यसभेवर गेलेल्या नारायण राणे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपने दिलेल्या कमिटमेंटबाबत मुख्यमंत्रीr चार-पाच दिकसांत मला सांगतील. त्यानंतर मी भाजपात असेन की महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात याचा निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या प्रवेशासाठी मंजुरी दिली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याची प्रतीक्षा आपल्याला आहे. प्रतीक्षेलाही मर्यादा असतात असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत नीतेश राणे काँग्रेस उमेदवार म्हणून लढणार नसल्याचेही राणे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या