माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना मातृशोक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कराड

माथाडींचे आराध्यदैवत दिवंगत माजी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पत्नी व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या आई वत्सलाताई पाटील (वय 65) यांचे गुरुवारी (दि. 25) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पाश्चात दोन मुली, तीन मुले, नातवंडे असा परिवार आहे.

माथाडी कामगार चळवळ उभी करताना वत्सलाताई पाटील यांनी दिवंगत माजी आमदार अण्णासाहेब पाटील यांना मोलाची साथ दिली होती. अण्णासाहेबांच्या निधनानंतर माथाडी कामगार चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांनी खंबीरपणे माथाडी नेत्यांना साथ दिली. अखेरच्या श्वासापर्यंत माथाडी चळवळीतील प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. वत्सलाताई या माथाडी कामगार चळवळीतील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत होत्या. त्यामुळे त्यांच्याबद्दल कामगारांमध्ये एक वेगळी आस्था होती. त्यांच्या निधनामुळे कामगारवर्गामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

वत्सलाताई अण्णासाहेब पाटील यांचे पार्थिव शुक्रवारी (दि. 26) सकाळी 9 वाजता माथाडी भवन, तुर्भे, नवी मुंबई येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.