राष्ट्रकुल स्पर्धेवरील बहिष्काराचा निर्णय सीजीएफ-आयएसएसएफ बैठकीनंतरच

294

राष्ट्रकुल क्रीडा महासंघ (सीजीएफ) आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ (आयएसएसएफ) यांच्यात होणार्‍या महत्त्वपूर्ण बैठकीनंतरच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाबाबत हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटना  (आयओए) आपल्या सर्वसाधारण सभेत अंतिम निर्णय घेईल, असे स्पष्टीकरण संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी केले आहे.

नेमबाजीला हद्दपार केल्यामुळे 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे होणार्‍या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बहिष्कार टाकण्याचा प्रस्ताव जुलै महिन्यात बात्रा  यांनीच सादर केला होता. मात्र महिन्याच्या पूर्वार्धात राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या पदाधिकाऱयांशी बात्रा  यांची चर्चा झाली. आता ‘सीजीएफ ’ आणि ‘आयएसएसएफ’ यांच्यातील आगामी बैठकीनंतर ‘आयओए’च्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बात्रा यांनी दिली.

टोकियोसाठी हिंदुस्थानचे 125 जणांचे पथक 

टोकियो  ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत 15 नेमबाजांनी स्थान पक्के केल्यामुळे हिंदुस्थान  एकूण 125 खेळाडूंचे पथक पाठवू शकतो, असे बात्रा यांनी स्पष्ट केले. 

आपली प्रतिक्रिया द्या