मंगळावर ही आहे ‘ऑक्सिजन’, नासाने लावला शोध 

1476

अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने मोठं यश मिळवलं आहे. नासाने ‘मंगळ’ ग्रहावर ऑक्सिजन गॅस असल्याचा दावा केला आहे. या शोधाचे श्रेय नासाने मंगळावर पाठविलेल्या ‘क्युरोसिटी रोव्हर’ या यानला दिले आहे. चला जाणून घेऊया क्युरिओसिटी रोव्हरने मंगळावर काय पाहिले?

नासाने 26 नोव्हेंबर 2011 रोजी क्युरोसिटी रोव्हर हे यान मंगळावर पाठवले होते. हे यान 6 ऑगस्ट 2012 रोजी मंगळावर लँड  झाले. त्यानंतर आतापर्यंत मंगळाच्या पृष्ठभागावर सुमारे 20 किलोमीटरचा प्रवास या यानने केला आहे. क्युरोसिटी रोव्हर हे सध्या गेलच्या खड्ड्यात असून ते तिथून संशोधन करत आहे.

क्युरोसिटी रोव्हर यान हे आकाराने खूप मोठे आहे. हे 10 फूट लांब, 9 फूट रुंद आणि 7 फूट उंच आहे. क्युरोसिटी रोव्हरमध्ये स्वतःची अशी एक प्रयोगशाळा आहे. जी विविध प्रयोग करते. आतापर्यंत या यानाने मंगळावरील मातीचे 70 हून अधिक नमुने तपासले आहेत. याच यानातील प्रयोगशाळेने या ग्रहावरील वायूची पडताळणीही केली आहे.

क्युरोसिटी रोव्हरच्या केमिस्ट्री लॅबने मंगळ ग्रहाच्या सौरमंडळात उपस्थित असलेल्या वायूंचा अभ्यास केला. यात असे आढळले आहे की, मंगळावर 95% कार्बन डाय ऑक्साईड, 2.6% नायट्रोजन, 1.9% अरगॉन, 0.16% ऑक्सिजन आणि 0.06% कार्बन मोनोऑक्साइड आहे. क्युरोसिटी रोव्हरने 2012 ते 2017 दरम्यान हे अध्ययन केले आहे. पृथ्वीच्या वातावरणानुसार मंगळावर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात अधिक ऑक्सिजन आढळले आहे. तर थंडीत कमी ऑक्सिजन आढळले आहे.

दरम्यान, मंगळाच्या गेल खड्ड्यात ऑक्सिजनचे प्रमाण एवढे का बदलत आहेत? याचा शोध घेण्याचा प्रयत्न नासाचे शास्त्रज्ञ करत आहे. ‘मिथेन आणि ऑक्सिजनमध्ये सतत रासायनिक प्रक्रिया होत असते. हा अगदी प्रारंभिक अंदाज आहे. आम्हाला अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे,’ असे क्यूरोसिटी मिशनशी संबंधित मिशिगन विद्यापीठाचे हवामान व अंतराळ विज्ञान प्राध्यापक सुशील अत्रेय म्हणाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या