नासाच्या संशोधकांना लागला मंगळावर वाऱ्याचा थांगपत्ता

573

थंड व कोरडा असलेल्या मंगळ ग्रहावर वारा वाहत असल्याचे नासाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून उघडकीस आले आहे. मंगळाच्या कक्षेत प्रवेश केलेल्या मार्स ऍटमॉस्फिअर अँड क्होलॅटाईल इक्होल्यूशन म्हणजेच ‘माकेन’ अंतराळयानाचे निरीक्षण याकामी महत्त्वपूर्ण ठरले आहे. मंगळापासून 120 ते 300 किलोमीटर वरच्या भागातील वाऱयाच्या प्रवाहाची नोंद नासाच्या संशोधकांनी केली आहे.

एखाद्या ग्रहाच्या वातावरणाचा प्रथमच अशाप्रकारचा अभ्यास केला जात आहे. या अभ्यासातून पुढे आलेले निष्कर्ष ‘जर्नल सायन्स’मध्ये गुरुवारी प्रकाशित झाले. मंगळाकर काही अब्ज कर्षांपूर्की पाणी आणि कार्बन डायॉक्साईड होता, त्याचे नेमके काय झाले, याची माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेच्या नासा संस्थेचे ‘मावेन’ हे अंतराळयान मंगळाच्या वातावरणाचे निरीक्षण करीत आहे. 2016 ते 2018 या तीन वर्षांत प्रत्येक महिन्यातील दोन दिवसांमध्ये ‘मावेन’ अंतराळयानाने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे संशोधकांनी मंगळाच्या वरच्या भागातील वाऱयाच्या दिशेचा थांगपत्ता लावला आहे. या मोहिमेत मेरिलॅण्ड बाल्टीमोअर काऊंटी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचाही समावेश आहे.

वाऱयाच्या स्थितीत विरोधाभास!
मंगळावरील वाऱयाचा प्रवाह सरासरी स्थिर असतो. मात्र छायाचित्र टिपताना तो प्रवाह अत्यंत बदलता दिसतो. वाऱयाच्या स्थितीत हा विरोधाभास का दिसून येतो, याचा आणखी अभ्यास करण्याची गरज आहे, असे ‘मावेन’ मोहिमेच्या प्रमुख मेहदी बेन्ना यांनी सांगितले.

– ‘मावेन’ अंतराळयान 2013 पासून मंगळाच्या कक्षेत आहे. नासाला संशोधनासाठी आवश्यक असलेली माहिती या यानाच्या माध्यमातून मिळवली जात आहे.
– मंगळाच्या वरील भागातील वाऱयाची दिशा ही हंगामानुसार (सिझन टू सिझन) अत्यंत स्थिर असते, असे नासाच्या संशोधनात आढळले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या