पार्टनरने केला घात; व्यावसायिकाचे 40 लाखाचे कांदे पळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चांदवडच्या कांदा व्यापाऱ्याची परप्रांतीय पार्टनरने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या पार्टनरने तब्बल 40 लाख 54 हजारांच्या कांद्याचा अपहार केल्याचे समोर आले असून याप्रकरणी काल चांदवड पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चांदवडचे पारस जव्हेरीलाल डुंगरवाल यांनी बिहारच्या सुरेंद्रकुमार भगतसोबत सन 2016 पासून भागीदारीत व्यवसाय सुरू केला. डुंगरवाल तेव्हापासून भगतला मागणीप्रमाणे कांदा पाठवत होते. सुरुवातीला भगतने आरटीजीएस, एनईएफटीद्वारे पैसे देऊन विश्वास संपादन केला. 7 डिसेंबर 2018 ते 11 नोव्हेंबर 2020 या काळात डुंगरवाल यांनी 9604 क्विंटल कांदा पाठविला. पंधरा रुपये किलो दराप्रमाणे 69 लाख 54 हजार 943 रुपयांपैकी आजपर्यंत भगतने 28 लाख 99 हजार 994 रुपये दिले. उर्वरित 40 लाख 54 हजार देण्यास टाळाटाळ केली.

पैसे घेण्यासाठी डुंगरवाल बिहार राज्यातील र्पूिणया जिल्ह्यातील गुलाबबाग येथे गेले असता भगतसह मुन्नीदेवी सुरेंद्रकुमार भगत, सचिनकुमार भगत, प्रीती भगत, सोनम भगत व सोनी भगत यांनी धमकावले, अशी फिर्याद काल डुंगरवाल यांनी चांदवड पोलीस ठाण्यात दिली.