नाशिक महापालिकेत आजपासून पाच दिवसांचा आठवडा

372

राज्य शासनाच्या निर्णयानुसार नाशिक महापालिकेतही पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. 29च्या शनिवारपासूनच ही अंमलबजावणी होणार असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शुक्रवारी पाच दिवसांच्या आठवड्याचे आदेश जारी केले. सोमवार ते शुक्रवार या काळात कामकाजाची वेळ ही 45 मिनिटांनी वाढविण्यात आली आहे. सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सवासहा अशी ही वेळ राहणार आहे. सर्व शनिवार, रविवार हे सुट्टीचे दिवस राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या